16 जूनला एचडीएफसीची ऑनलाईन सर्व्हिस बंद

hdfc-bank

येत्या 16 जून रोजी एचडीएफसी बँकेची ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिस काही काळ बंद असेल. बँकेने खातेदारांना एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

एचडीएफसी बँकेच्या मोबाईल आणि नेटबँकिंगच्या ऍपवर 9 जून आणि 16 जून रोजी काही ट्रान्झेक्शन होणार नाहीत, असे बँकेने ग्राहकांना कळवले आहे. 16 जून रोजी पहाटे 3.30 ते सकाळी 7.30 नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंच्या व्यवहारावर निर्बंध असतील.