
बँकिंग सेक्टरमध्ये मोठा बदल करण्याची तयारी भारतीय रिझर्व्ह बँक करत आहे. नव्या व्यवस्थेअंतर्गत आता बँक खातेदारांना मोबाईल सिमप्रमाणे बँक खातेसुद्धा पोर्टेबल करण्याची सुविधा मिळू शकेल. आरबीआय आपले पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत ही सिस्टम आणण्याची तयारी करत आहे. ही सिस्टम लागू झाल्यानंतर बँक खातेदारांना आपल्या खाते एका बँकांतून दुसऱया बँकेत पोर्ट करता येईल. यामुळे ग्राहक आपले सर्व ऑटो पेमेंट, बिल, ईएमआय आणि अन्य स्टँडिंग इन्स्ट्रक्शन कोणत्याही त्रासाशिवाय, नव्या बँकेत ट्रान्सफर करू शकतील.
सध्या बँकेचे अकाऊंट बदलणे ग्राहकांसाठी मोठे जिकिरीचे काम आहे. बँक खात्यात अनेक प्रकारचे ऑटोमेटिक पेमेंट जोडलेले असते. ही अडचण दूर करण्यासाठी आरबीआय पेमेंट्स स्विचिंग सर्व्हिसवर काम करत आहे. नव्या प्लॅटफॉर्म अंतर्गत ग्राहकांना एक अशी सिस्टम मिळेल. ज्यात सर्व पेमेंटसंबंधी माहिती एका जागी उपलब्ध होईल. यामुळे ग्राहक सर्व देवाण घेवाण सहज पाहू शकतील. गरज पडल्यास दुसऱया बँकेत खाते शिफ्ट करू शकतील. या व्यवस्थेमुळे ग्राहकांना आता एकाच बँकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. बँकिंग सेवेत स्पर्धा वाढल्याने याचा फायदा ग्राहकांना होईल. आरबीआय विदेशी देवाण-घेवाण वेगवान दिशेने काम करत आहे. यासाठी संपूर्ण सिस्टमची समीक्षा करेल. या बदलाचा उद्देश नवीन फिनटेक पंपन्यांना संधी देणे, इनोवेशन वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनला सोपे करणे आहे.

























































