युवासेनेच्या गोंदिया जिल्हा युवा अधिकारीपदी कगेश मोहनराव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोंदिया जिह्यातील आमगांव व अर्जुनी मोरगांव या विधानसभेच्या युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी कगेश मोहनराव यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.