
न्यूझीलंडचा केन विल्यमसन अद्याप पूर्णपणे फिट नसल्यामुळे पुणे कसोटीलाही मुकणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना अनफिट झालेल्या विल्यमसनने दुखापतीमुळे हिंदुस्थानी दौऱ्यावर न येता थेट न्यूझीलंड गाठले होते. त्याच्या अनुपस्थितीत विल यंग हा तिसऱ्या क्रमांकावर खेळला. त्याने बंगळुरू कसोटीत 33 आणि नाबाद 48 धावा केल्या.
सध्या न्यूझीलंडच्या फलंदाजीला विल्यमसनची गरज असून त्याची दुखापत वेगाने बरी होत असल्याचे संघ प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी सांगितले. तो मुंबई कसोटीसाठी नक्कीच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा पराभव केल्यामुळे न्यूझीलंडचे मनोधैर्य उंचावले असले तरी पुण्यात हिंदुस्थानी संघ पराभवाचा वचपा काढेल, अशी भीती न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने विजयानंतर व्यक्त केली होती.