निवडणूक आयोगाला याची चिंता आहे का? महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी कपिल सिब्बल यांचा सवाल

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की राज्यातील महापालिकांमध्ये 69 पैकी 68 जागांवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध विजयी होणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी चिंताजनक असून आपल्या निवडणूक व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे त्यांनी नमूद केले.

सिब्बल यांनी पुढे म्हटले की सध्याच्या परिस्थितीत पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यांचा प्रभाव निवडणुकांवर स्पष्टपणे दिसत आहे आणि यामुळे निकाल ठरू लागले आहेत. लोकशाही प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होत असून ही परिस्थिती आपल्या निवडणूक पद्धतीसमोरील गंभीर संकट असल्याचा त्यांनी इशारा दिला. तसेच या घडामोडींवर निवडणूक आयोग चिंतित आहे का? आणि याबाबत तो कोणती भूमिका घेणार, असा थेट प्रश्नही सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.