
केरळ उच्च न्यायालयाने ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम’ कार्यक्रमाला आव्हान देणारी जनहित याचिका स्वीकारली. ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम’ हा कार्यक्रम म्हणजे भगवान अय्यप्पांच्या नावाने आयोजित केला जाणारा एक राजकीय मेळावा असून त्याला परवानगी देऊ नये, अशी याचिका अजिश कलाथिल गोपी यांनी दाखल केली आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या (टीडीबी) सबरीमाला जवळील पंबा येथे हा संगमम कार्यक्रम होतो.