
केरळची नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेन येथे फाशी दिली जाणार आहे. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात या नर्सची फाशी थांबवण्यासाठी फार काही केले जाऊ शकत नाही असे सांगितले.
एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी निमिषा प्रियाला दोन दिवसांनी येमेन येथे फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. तिची फाशी रोखण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, यासंबंधीच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडला. या वेळी सरकारी वकिलांनी हे विधान केले. ‘येमेन जगातील इतर कुठल्या भागाप्रमाणे नाही. सार्वजनिक पद्धतीने जाऊन आम्हाला परिस्थिती अजून किचकट बनवायची नव्हती. आम्ही खासगी पातळीवर प्रयत्न करत आहोत, असे सरकारकडून सांगण्यात आले.