केरळमध्ये 339 उमेदवार कोट्यधीश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 883 उमेदवारांपैकी तब्बल 339 उमेदवार कोटय़धीश आहेत. त्यांची सरासरी 2.78 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. कोट्यधीश उमेदवारांपैकी सर्वाधिक 61 काँग्रेसचे तर केरळमध्ये कधीही सत्तेत न आलेल्या भाजपचे 51 उमेदवार कोट्यधीश आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कोट्यधीश उमेदवारांचा आकडा वाढला आहे.