
खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने समारोपाच्या दिवशी रूपेरी सांगता केली. सागरी जलतरणात साताऱ्याच्या दिक्षा यादवचे रौप्यपदक पटकावले.
दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्या सत्रात 5 कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्या गटात सुरूवातीपासून महाराष्ट् व कर्नाटकात चुरस रंगली. महाराष्ट्राची दिक्षा यादव 4 किमी पर्यंत आघाडीवर होती. निर्णायक टप्पात कर्नाटकच्या अश्मिता चंद्राने दीक्षासोबत बरोबरी केली. अखेरच्या टप्प्यात 1.35.11 वेळ नोंदवून अश्मिताने स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्ण जिंकले. 1.35.53 वेळेसह दीक्षाने रूपेरी यश संपादन केले. कर्नाटकच्या असरा सुधीरने कांस्यपदकाची कमाई केली.
दीव येथील स्पर्धेत सलग दोन पदकाचा करिश्मा दीक्षा यादवने घडविला. गतवर्षी याच प्रकारात तीने 2 सुवर्णपदके जिंकली होती.
साताऱ्यातील दिक्षा ही पुण्यातील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करते. खेलो इंडिया विद्यीपीठ स्पर्धा, खेलो इंडिया युवा स्पर्धा तर खेलो इंडिया बीच स्पर्धेत 17 पदके जिंकण्याचा पराक्रम तीने केला आहे. पथकप्रमुख नवनाथ फडतरे यांनी दीक्षाचे अभिनंदन केले आहे.
गेली 6 दिवस घोघला समुद्र किनाऱ्यावर दुसर्या खेलो इंडिया बीच स्पर्धेचा थरार रंगला. सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने स्पर्धेत सर्वाधिक पदकाची बाजी मारली. तामिळनाडूने स्पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले.
स्पर्धेत महाराष्ट्राचे 77 जणांचे पथक सहभागी झाले होते. या्मध्ये 31 पुरूष¨व 28 महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य, 5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे.

































































