रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या किआराची राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधील 12वीची विद्यार्थिनी किआरा लुईस हिची आरएसआय-इंडिया2025 या अत्यंत प्रतिष्ठत राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम सेंटर फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन, यूएसए आणि इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. हा पूर्णतः अनुदानित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च, शिक्षण, निवास आणि जेवण इत्यादी आयोजकांद्वारे दिले जाते.