के. एल. राहुलच्या ट्रान्स्फर चर्चांना विराम

आयपीएल 2026 पूर्वी सुरू असलेल्या खेळाडूंच्या ट्रेडिंग चर्चांमध्ये दोन मोठ्या नावांबाबत स्पष्टता आली आहे. वॉशिंगटन सुंदर आणि के. एल. राहुल हे दोघेही सध्याच्या फ्रेंचायझीतच कायम राहणार आहेत. वॉशिंगटन सुंदरला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) साईन करण्याची चर्चा होती, तर के.एल. राहुलचा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडे ट्रान्स्फर होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ताज्या अहवालांनुसार दोन्ही करार रद्द झाले आहेत.