कोलकातामधील आर. जी. कर मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांमध्ये संताप आहे. या घटनेचा निषेध करत देशातील हजारो डॉक्टरांनी संपही पुकारला आहे. आता लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही या प्रकरणी ट्विट करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोलकातामध्ये ज्युनिअर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या बीभत्स घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानुष आणि क्रूर घटनेवरून एक एक पडदा उठत आहे. यामुळे डॉक्टर आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कोलकाता में जूनियर डॉक्टर के साथ हुई रेप और मर्डर की वीभत्स घटना से पूरा देश स्तब्ध है। उसके साथ हुए क्रूर और अमानवीय कृत्य की परत दर परत जिस तरह खुल कर सामने आ रही है, उससे डॉक्टर्स कम्युनिटी और महिलाओं के बीच असुरक्षा का माहौल है।
पीड़िता को न्याय दिलाने की जगह आरोपियों को…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2024
पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न हॉस्पिटल आणि स्थानिक प्रशासनाकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नावरून गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. हाथरसपासून ते उन्नाव, आणि कठुआपासून ते कोलकातापर्यंत महिलांनावरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर प्रत्येकाने गंभीर विचार-विनिमय करून ठोस उपाय करण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. या घटनेत पीडितेच्या कुटुंबीयांसोबत मी उभा आहे. त्यांना कुठल्याही परिस्थिती मदत झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.