कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले सचिन तोडणकर हे दापोली येथील कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवित आहेत. त्यांनी आपल्या पदाची गरीमा राखत पदाला साजेसे काम करून विविध प्रकारच्या सन्मानाचे पुरस्कार गावाला मिळवून दिले आहेत. देश पातळीवर कर्दे गावाला कृषी पर्यटनाचा मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा या गावाची महती सांगणारा असा महत्वाचा पुरस्कार आहे. कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले सचिन तोडणकर हे कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आसल्याचा विद्यापिठाला सार्थ अभिमान असल्याची भावना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे यांनी व्यक्त केली.
केंद्राचा सर्वोकृष्ट कृषी पर्यटन पुरस्कार कर्दे ग्रामपंचायतीला मिळाला. मिळालेल्या संधीचे सोनं करत सचिन तोडणकर यांनी आपले कल्पक नेतृत्व पणाला लावून मिळविलेल्या या महत्त्वाच्या पुरस्काराचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाकडून कृषी विद्यापीठात सरपंच सचिन तोडणकर यांचा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.
सचिन तोडणकर हे विद्यार्थी दशेत असल्यापासून नम्र, हुशार विद्यार्थी होते. हॉटेल व्यवसाय सांभाळत कर्दे गावचे सरपंच पद सांभाळलीत ग्रामविकासाचा कर्दे पॅटर्न त्यांनी तयार केला. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन कर्दे गावाचा कायापालट केला. या कामाची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील कर्दे गावाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण कृषि पर्यटन गाव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार सचिन तोडणकर यांनी सर्जनतेने आणि प्रयोगशिलतेने केलेल्या कामाची पोहोचपावती आहे. यासाठी सचिन आपला आम्हां कृषी विद्यापीठ परिवाराला सार्थ अभिमान आहे . असे गौरवोद्रद्वार विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी काढले.