Kopargaon News – रस्त्यावर कार पेटली, पाचजणांचं कुटुंब थोडक्यात बचावलं, इंजिन जळून खाक

कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी तेरा बंगले रस्त्यावर टाइनी टॉट शाळे समोर धावत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या गाडीने एकाच कुटुंबातील पाचजण प्रवास करत होते. या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून इंजिन जळून खाक झाले आहे.

नाशिकहून पाच जणांचे कुटुंब कोपरगावला निघाले होते. कोपरगावला जात असताना गोकुळनगरी टाइनी टॉस शाळेसमोर दुपारी 2 च्या दरम्यान त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. गाडी गरम झाल्याने गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचा प्राथिमक अंदाज वर्तवला जात आहे. गाडीने पेट घेताच शहरातील काही तरुणांनी तत्काळ सर्वांना गाडीबाहेर काढले आणि गाडीची बॅटरी काढून बाहेर फेकली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच त्यांनी तत्काळ कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीवदान मिळाले.