कोपरगावात घडली धक्कादायक घटना: वाळूचोरांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

वाळु चोरट्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र कोपरगावामध्ये आहे. त्याचाच प्रत्यत येथील महसूल कर्मचाऱ्यांना आला. अवैध वाळू नेणारा एक ट्रँक्टर महसूल पथकाने ताब्यात घेतला असता त्यांना अडवून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगावात घडला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याल आला आहे.

सदर घटना शनिवारी (8 जून 2024) रात्री सुरेगाव परिसरात घडली. नायब तहसीलदार प्रफुल्लिता तासपुते यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 च्या सुमारास त्या महसुल कर्मचारी संकेत पवार व योगेश साळुंके आदींसमवेत कर्तव्यावर होत्या. सुरेगाव हद्दीत गेल्या असता त्याना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याच्या प्रवेशद्वारा समोर माहेगाव देशमुख हद्दीत असणाऱ्या मारूती मंदिरासमोर एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसला. सदर ट्रॅक्टर हा निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा होता. ट्रॅक्टरमध्ये चोरी केलेली 5 हजाराची एक ब्रास वाळू आढळुन आली होती. ट्रॅक्टर समवेत एक हिरो कंपनीची दुचाकी (MH17CF3642) आणि एक पांढऱ्या रंगाची मराठी क्रमांक असणारी मारुती स्विफ्ट कार होती. सदरच्या कारवाईत ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला होता. ट्रॅक्टर घेऊन महसूल कर्मचारी निघाले असता त्यांना अडवून आरोपी कैलास देवराम कोळपे, आकाश मदने, सुनीन मेहेरखांब या तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. त्यानंतर तिघेही ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. या प्रकरणी सरकारी कामात अढतळा आणने, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3 व 15 प्रमाणे तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.