कुख्यात नीलेश घायवळच्या घरात पोलिसांची सर्चमोहीम; काडतुसे, कुंगळ्या सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

nilesh-ghaiwal-passport-issued-without-verification

मोक्का कारवाईनंतर परदेशात पलायन केलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या घरात कोथरूड पोलिसांनी सर्चमोहीम राबविली. त्यावेळी त्याच्या घरात पोलिसांनी दोन काडतुसे, चार कुंगळ्या मिळून आल्या आहेत. याप्रकरणी घायवळकिरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घायवळच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किरकोळ वादातून घायवळ टोळीने तरुणावर गोळीबार करून त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्कये (मोक्का) कारकाई केली. दरम्यान, मोक्का दाखल होताच गुंड नीलेश घायवळ हा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून स्वित्झलॅण्डला पसार झाला.

कोथरूड पोलिसांनी शनिकारी घायवळच्या घराची झडती घेतली. श्री संत ज्ञानेश्वर कॉलनीतील घायवळच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. त्याच्या घरातील कपाटातून दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, कोथरूड पोलीस ठाण्याचे करिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यान, शस्त्र्ासाठा केल्याप्रकरणी घायवळविरुद्ध शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 5, 7, 25 (1), 27 (2) अन्कये कोथरूड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एपीआय रकींद्र आळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

‘गुंड नीलेश घायवळ याचे कोथरूडमधील घर आणि कार्यालयाची झडती घेतली. त्या ठिकाणाहून दोन काडतुसे, चार कुंगळ्या, 60 हजारांची रोकड, 10 तोळे सोन्याचे दागिने, पुणे, मुळशी, जामखेड, धाराशीक जिह्यातील जमिनींचे खरेदीखत, साठेखतासह इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.

     z संभाजी कदम, पोलीस उपायुक्त