
टीम इंडियाचा डावखुरा फिरकीवीर कुलदीप यादव हा त्याची बालपणीची मैत्रिणी वंशिका चड्डासोबत लग्नबंधनात अडकला आहे. उत्तराखंडमधील मसूरी येथील सवॉय हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.
टी-20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर कुलदीपच्या घरात लगेच लगीन घाईला सुरुवात झाली. कुलदीपच्या हळदी सोहळ्याचे देखील फोटो व्हायरल झाले होते. या सोहळ्याला टीम इंडियाचा गोलंदाज युझवेंद्र चहलने हजेरी लावली होती. तर लग्न सोहळ्याला रिंकू सिंह, शुभम दुबे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, मोहम्मद कैफ, तिलक वर्मा व नितीश राणा यांनी हजेरी लावली.
लग्नात कुलदीपने आयव्हरी रंगाची शेरवानी घातली होती. तर वंशिकाने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. या लग्नासाठी सवॉय हॉटेलला सुंदर फुलांची सजावट केली होती.


























































