सप्टेंबर महिना म्हंटलं की संपूर्ण मुंबईकरांना वेद लागतात ते गणेशोत्सवाचे. मुंबईत दिवस रात्र भाविकांची बाजारात रेलचेल सुरू असते. आता तर बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना एका भयंकर अपघाताने रविवारी संपूर्ण मुंबई हादरली. मुंबईच्या लालबाग परिसरात दारुड्या प्रवाशाने बसचे स्टेअरिंग फिरवल्याने बसने वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत 8 जण जखमी झाले. तर एका तरुणीची या अपघातात दुर्दैवी अंत झाला. या तरुणीचे नाव नुपूर मणियार असून ती लालबागची रहिवाशी आहे.
रविवारी रात्री 66 नंबरची बस लालबाग परिसरात आली. बस गरमखाडा येथे सिग्नलला उभी होती. तेव्हा बस चालक कमलेश प्रजापतीच्या बाजूला दत्ता शिंदे नावाचा प्रवासी उभा होता. दारूच्या नशेत असलेल्या शिंदेने बसचे स्टिअरिंग बळजबरीने डाव्या बाजूला फिरवले. त्यामुळे बसने दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात 8 जण जखमी झाले तर 28 वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.
नुपूर मणियार या तरुणीचा असा अपघाची मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांलर दुख:चा डोंगर कोसळला आहे. नुपूर ही मणियार कुटुंबातील कर्ती मुलगी होती. कोरोनाच्या माहामारीत नुपूरच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर घरातील मोठी मुलगी म्हणून नुपूरवरच तिच्या आई आणि बहिणीची जबाबदारी होती. नुपूरचं लग्न देखील ठरलं होत. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रविवारी रात्री लालबाग येथे झालेल्या अपघातात नुपूर मणियारला आपला जीव गमवावा लागला.
बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 66 क्र क्रमांकाची (Electra) बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेनं जात असताना एक भयंकर अपघात घडला. याआधी एका दारूच्या नशेत असणाऱ्या प्रवाशाची वाहकासोबत झटापट झाली. यादरम्यान वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बसने दोन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल आणि पादचाऱ्यांना धडक दिली. दरम्यान पोलिसांनी बसमधील दारुडा प्रवाशी आरोपी दत्ता शिंदे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.