
इंडियन प्रीमियर लीगचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी लंडनमध्ये फरार उद्योजक विजय मल्ल्या यांच्या वाढदिवसानिमित्त एका आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. ललित मोदी यांच्या बेलग्रेव स्क्वायर येथील बंगल्यावर ही पार्टी झाली. या पार्टीला अनेक बड्या लोकांची उपस्थिती होती. बायोकॉनचे संस्थापक किरण मुजुमदार-शॉ, अभिनेते इदरीस एल्बा आणि फॅशन डिझायनर मनोविराज खोसले यासारखे सेलिब्रिटींनीही या पार्टीला हजेरी लावली.
ललित मोदी यांनी विजय मल्ल्या यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीचे फोटोंमध्ये किरण मुजुमदार-शॉ मनोविराज खोसला यांच्यासोबत फोज देताना आणि इदरीस एल्बा यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर जिम रायडेल यांनी या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून विजय मल्ल्या यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केल्याबद्दल ललित मोदी यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, उद्योजक विजय मल्ल्या 2016 मध्ये हिंदुस्थान सोडून ब्रिटनमध्ये गेले. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग सारखे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. तर ललित मोदी यांनी 2010 मध्ये आर्थिक हेराफेरीच्या आरोपानंतर हिंदुस्थान सोडले होते.



























































