लँड फॉर जॉब’ प्रकरण – लालू यादव यांच्यासह 41 जणांवर आरोप निश्चित

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष सीबीआय न्यायालयाने आज ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुलगे तेजप्रताप, तेजस्वी, मुली मीसा आणि हेमा यांच्याविरोधात आरोप निश्चित केले आहेत. लालूंच्या कुटुंबीयांसह 41 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात खटला चालणार आहे.

नवी दिल्ली येथील राऊज एव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी मीसा भारती, तेजप्रताप यादव, तेजस्वी यादव हे न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने आरोप निश्चित करताना म्हटले की, संशयाच्या आधारे न्यायालयाला हे आढळून आले आहे की, लालूप्रसाद यादव यांनी शासकीय नोकरीचा वापर आर्थिक व्यवहारासाठी करण्याचा कट रचला होता. त्यांनी त्यांचु कुटुंबीयांसाठी स्थावर मालमत्ता गोळा करण्यासाठी शासकीय नोकऱयांचा सौदा केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी होणार आहे.

लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना कोटय़वधी रुपयांच्या जमिनी लालूंच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आल्या होत्या.