
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीच्या कामगारांना या वर्षी 62,250 रुपये बोनस मिळणार आहे. दिवाळीपूर्वी पवई मुंबई युनिटमधील सर्व कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेनेचे चिटणीस सुधा आंगणे, चिटणीस संदीप राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
या बैठकीला व्यवस्थापनाचे अधिकारी आयआर हेड जीएम सुहास घटवाई, उपाध्यक्ष एचआर हेड मनीष गौर, जेजीम अजित पंडितराव, भारतीय कामगार सेना एल अॅण्ड टी युनिटचे अध्यक्ष यशवंत सावंत, कार्याध्यक्ष अमोल शिळीमकर, सरचिटणीस विनायक नलावडे, उपाध्यक्ष कृष्णकांत कदम, खजिनदार प्रवीण मोरे तसेच व्यवस्थापकीय समितीचे सिनियर डीजीएम हरीश महाडिक, डीजीएम प्रशांत पाटील, डीजीएम मनीष पालकर, एजीएम रश्मी घरत उपस्थित होते.