
अहमदपुर तालुक्यातील गोताळा येथील अवकाळी पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या आठ जणावर विज पडल्याने दोघाचा जागीच मृत्यु तर सहा जण जख्मी झाल्याची घटना गोताळा शिवारात सोमवारी सांयकाळी 4.30 च्या दरम्यान घडली .
विक्रम सोपान कारले वय 48 तर रंजनाबाई बळी समुखराव वय 45 असे मृताची नांवे आहेत इतर सहा जण जख्मी असून दोघाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते .अहमदपुर शहर व परिसरात सोमवारी सांय .4.30 च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजाचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली या पावसात गोताळा येथील आठ जण निवाऱ्यासाठी झाडाखाली थांबले असता विज कडकड्न झाडावर पडली त्यात दोघाचा मृत्यु तर सहा जण जख्मी झाले जखमी मध्ये सुरेश विक्रम कारले वय 30 वर्ष आर्पिता भास्कर कांबळे 20 वर्ष , कविता महेश कारले 26 वर्ष महानंदा सुर्यवंशी 52 वर्ष , बालिका कांबळे 35 वर्ष , आरती जाधव 21 वर्ष जखमीला उपचारासाठी अहमदपूर येथे तर कांही जणांना लातूरला पाठवण्यात आल्याचे समजते.