‘माझा पप्पा व भैया तुमचाकडे आला का हो’; लेकीची अंत्यविधिवेळी आलेल्यांना भावनिक साद! बाप, लेकाचा अंत्यविधी एकाच सरणावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
emotional farewell to father and son in jalot: killed in tragic car accident

मुलीच बापावरच व भावा वरच प्रेम जिव्हाळ्याचे असते हे त्रिकालबाधित सत्य आहे मुलगी ‘पप्पा पप्पा म्हणत होती पण बापाची साद कांही मुलीच्या कानावर पडत नव्हती मुलाचा भविष्यासाठी आहोरात्र मेहनत घेणाऱ्या वडील व भावाला हा आखेरचा निरोप देण्यासाठी एक लेक ‘माझे पप्पा व भैया कालपासून दिसत नाहीत आले काहो तुमचाकडे म्हणून अंत्यविधीसाठी आलेल्याना भावनिक साद घालत होती यामुळे अंत्यविधीसाठी आलेत्यांना आपले अश्रू रोखता येत नव्हते तर पत्नी सुनिता यांनी डोळ्यासमोर घडलेल्या अपघातात पती व मुलगा गमावल्यामुळे स्मशानात त्यांचा आक्रोश सार्वांना रडवत होता एकाच सरणावर पती व मुलाचा मृतदेह जळत असतानाचे चित्र पाहून पत्नी ग्रामस्थानी एकच हंभरडा फोडला.

जळकोट तालुक्यातील उमरगा (रेतू ) येथील येथील आदर्श शेतकरी तथा गावचे उपसरपंच अंकुश विश्वनाथ गिते (वय ४६ वर्ष) मुलगा ओमकार अकुंश गिते (वय २५ वर्ष) आपल्या ५ एकरवर भाजीपाला लागवड करून उपजीविका भागवत होते मेहनती कुटुंब काल रविवारी दिवसभर अंकुश गिते , पत्नी सुनिता गिते , मुलगा ओमकार गिते यांनी जळकोटच्या सोमवारी आठवडी बाजाराच्या विक्रीसाठी गाजर काढले त्याचे शेत सडकेच्या कडेलाच असल्यामुळे सायंकाळी ७ ते ७ ३० च्या दरम्यान घराकडे जाण्यासाठी दुचाकीवरून अंकुश गिते मुलगा ओमकार अंकुश यांची पत्नी सुनीताची वाट पाहत रस्त्याच्याकडेला थांबले असता जांब कडून हडोळतीकडे भरधाव वेगात येणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने एम . एच . २४ बी २२९४ रस्त्याच्याकडेला थांबलेल्या या बापलेकाला ५० ते ६० फुट फरफटत घेऊन गेले त्यामुळे अपघात इतका भयाण होता की अपघाताचा आवाज परिसरात घुमला क्षणात होत्याचे नव्हते झाले मुलगा जागेवर ठार झाला. तर वडिलांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात येथे घेऊन गेले असता मृत घोषित केले. सोमवारी सकाळी ९:३० वाजता बापलेकाचे मृतदेह गावात दाखल झाले १०:३० वाजता त्यांच्या शेतामध्ये एकाच सरणावर अंत्यसकार करण्यात आले. स्वीफ्ट डिझायर गाडीमधील ड्रायव्हर व सोबतचे मद्यधुंद अवस्थेत होते गाडी मध्ये दोघे होते एक पसार झाला तर एकाला गावकऱ्यांनी पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.