दररोज केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आपल्याकडे केळी हे फळ अगदी सहजसुलभ उपलब्ध होते. बारही महिने मिळणारी ही केळी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. दररोज केळी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. केळी सहज पचणारे, पौष्टिक आणि ऊर्जादायी फळ आहे. नियमितपणे केळी खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे लाभ मिळतात.

मानसिक आरोग्यासाठी लाभदायक– केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे शरीरात सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे तणाव कमी होतो आणि मूड चांगला राहतो.

हिवाळ्यात ओठ फुटलेत, करुन बघा हे साधे सोपे घरगुती उपाय

हाडे व स्नायूंना बळकटी– केळीतील खनिजे व व्हिटॅमिन्स स्नायूंच्या आकडी कमी करतात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर– केळीमध्ये असलेली पोषक तत्त्वे त्वचा तेजस्वी ठेवतात आणि केस मजबूत करतात.

ऊर्जा वाढवते– केळीमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रक्टोज) आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे थकवा दूर होतो आणि शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. व्यायामापूर्वी किंवा कामाच्या दरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेडस् काढण्यासाठी वापरा ही साधी सोपी पद्धत, वाचा

पचन सुधारते– केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. अ‍ॅसिडिटी व गॅसचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त– केळी पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात मदत– केळी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. योग्य प्रमाणात केळी घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

आहारात वेलचीचा समावेश करण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा