असं झालं तर… शेजारचा शेतकरी शेतजमिनीच्या वाटणीला विरोध करत असेल तर… 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 शेतजमीन ही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित असू शकते. वडिलोपार्जित शेतजमिनीत सर्व सहहिस्सेदारांना (भाऊ, बहिणी इ.) कायदेशीर हक्क असतो.

2 शेजारचा शेतकरी हा सहहिस्सेदार नसल्यास त्याला तुमच्या जमिनीच्या वाटणीला थेट विरोध करण्याचा कोणताही अधिकार नाही. तो वाटणी थांबवू शकत नाही.

3 जर शेजारी वाटणी किंवा सीमांकनास अडथळा आणत असेल तर सर्वप्रथम तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करावा.

4 मोजणी महाराष्ट्र महसूल विभागांतर्गत अधिपृतपणे केली जाते. शेजारी तो गैरहजर राहिला किंवा विरोध केला तरी महसूल अधिकारी मोजणी पूर्ण करू शकतात.

5 सहहिस्सेदारांमध्ये वाटणी झाल्यानंतर नोंद सातबारा उताऱयावर करा. वाद वाढला तर उपविभागीय अधिकारी  किंवा तहसीलदारांकडे, दिवाणी न्यायालयाचा पर्याय आहे.