
केरळ सरकारच्या सामान्य शिक्षण विभागाने दहावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात ‘लोकशाहीः एक भारतीय अनुभव’ या शीर्षकाखाली नवा धडा समाविष्ट केला. धड्यात राज्यपालांचा घटनात्मक अधिकार व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या आहेत. शालेय अभ्यासक्रम समितीच्या बैठकीत शिक्षणमंत्री व्ही शिवनपुट्टी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी, चौथी, सहावी आणि आठवी आणि दहावीच्या पुस्तकांतील बदलांना मंजुरी देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना राज्यपालांबाबत स्पष्ट आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांविषयी नेमकी माहिती मिळावी, हा शैक्षणिक उद्देश सांगितला जात आहे.