
लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. लखनऊच्या ला मार्टिनियर कॉलेज, लखनऊ विद्यापीठ आणि इंडियन मिलिट्री अकादमी देहरादूनचे ते विद्यार्थी आहेत. जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची जागा घेतली आहे. पुष्पेंद सिंह हे गेल्या 38 वर्षापासून लष्करात असून त्यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन मेघदूत (सियाचिन), ऑपरेशन ऑर्चिड, ऑपरेशन रक्षा (कश्मीर) यांसारख्या ऑपरेशनमध्ये कामगिरी बजावली आहे.