दूध हे आरोग्यासाठी गुणकारी असून त्यात केसर घालून ते प्यायल्यास ते आणखी बहुगुणी आहे. केसरला गोल्डन स्पाइस या नावानेही ओळखले जाते. ते दुधात मिसळून प्यायल्यास त्याचे चमत्कारीक फायदे होतात. नियमितपणे केसर घालून दूध प्यायल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
गर्भवती महिलांसाठी गुणकारी
गर्भवती महिलांसाठी केसर घालून दूध पिणे एक वरदान आहे. केसर गर्भवती महिलेचे आरोग्य उत्तम बनवते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. त्याने गर्भवती महिलेचा मूड चांगला राहतो. पोटाच्या समस्यांवर आराम मिळतो आणि गर्भात शिशुच्या विकासात मदत मिळते. शिवाय केसर घालून दूध प्यायल्याने बाळाच्या त्वचेचा रंग उजळतो.
तणावग्रस्त लोकांसाठी बहुगुणी
धावपळीच्या जीवनशैलीत तणाव एक समस्या बनलेले आहे. अशावेळी तणाव कमी करण्यासाठी केसर घालून दूध पिणे उत्तम मानले जाते. केसरमध्ये असे तत्व आहेत जे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे केसर घालून दूध प्यायल्याने शांत झोप मिळते आणि मन प्रसन्न राहते.
हृदयविकार असलेल्या लोकांसाठी फायदेशीर
केसर घातलेले दूध हृदय विकार असलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, केसरमध्ये असलेले अॅण्टीऑक्सिडेण्ट हृदयाच्या धमन्यांना मजबूत करतात आणि रक्तप्रवाह चांगला करतात. याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. शिवाय केसर घालून घेतलेले दूध कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त
ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी केसर घालून दूध प्यावे. केसरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषक घटक प्रतिकार शक्ती मजबूत करते. ज्याने शरीराला आजारांशी लढण्यास मदत मिळते. विशेष करुन थंडीच्या दिवसात याचा जास्त फायदा होतो.
त्वचेशी संबधित आजार
केसर घालून दूध प्यायल्यास त्वचेच्य़ा समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. केसमध्ये अॅण्टी इंफ्लेमेटरी गुण असून त्याने त्वचेला होणारी जळजळ आणि सूज कमी करते. याच्या नियमित सेवनाने त्वचेचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचा कोमल आणि तजेलदार होते.
हे दूध असे बनवा
एक ग्लास गरम दुधात दोन ते तीन केसरच्या काड्या घाला आणि ते चांगले मिक्स करा. चवीसाठी त्यात मध किवा साखर मिक्स करु शकता. त्यानंतर रात्री झोपताना ते दूध प्यावे.