
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडे सात दरम्यान बोरिवलीच्या दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.