Air India Plane Crash – नावडती 11 ए सीट विश्वास कुमार यांच्यासाठी ठरली लकी

अपघातग्रस्त विमानातून बचावलेले विश्वास कुमार 11 ए क्रमांकाच्या सीटवर बसले होते. बोइंग 737-8 विमानांमधील इकॉनॉमी क्लासमधील पहिल्या रांगेत 11 ए क्रमांकाची सीट आहे. ही सीट आपत्कालीन एक्झिटच्या जवळ असते. त्यामुळेच विश्वास कुमार यांना लगेच बाहेर पडता आले आणि ते चमत्कारिकपणे वाचले. खरं तर बोइंगमधील 11 ए सीट कुणालाच पसंत नसते. कारण या सीटच्या जवळ खिडकी येत नाही. केवळ लहानशी गोलाकार खिडकी येते. तिथून बाहेरचे फारसे दिसत नाही. बोइंग 737-800 मधील 11 ए सीटजवळ एक डक्ट असतो. त्यामुळे खिडकीची जागा ब्लॉक होते. ज्या प्रवाशांना खिडकीजवळील सीट हवी असते ते ही सीट घेणे टाळतात. हीच नावडती सीट विश्वास कुमार यांच्यासाठी लकी ठरली.