
म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. आघाडीच्या उमेदवारांनी म्हसळा येथील गणेश मंदिर तसेच ग्रामदैवत धावीर देव मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.
यावेळी पाभरे जिल्हा परिषद उमेदवार संतोष पाटील, पाभरे पंचायत समिती उमेदवार ज्योती गिजे, खरसई उमेदवार रमेश खोत, पांगलोळी जिल्हा परिषद उमेदवार रोशन पारावे, पांगलोळी उमेदवार चैतन्या गजमल, साळविंडे उमेदवार बाळा म्हात्रे, तालुकाप्रमुख तुकाराम चाळके, परशुराम मंडदकर, विनायक गिजे, कौस्तुभ करडे, उपशहरप्रमुख दीपल शिर्के, पांडुरंग सुतार, हेमंत नाक्ती, जितेंद्र गिजे, कल्पेश बिराडी आदी उपस्थित होते.




























































