महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स सोमवारपासून प्रीती, झैदला अव्वल मानांकन

भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेला 16 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ऍण्ड गाईडच्या सभागृहात सुरुवात होत असून या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात 340 तर महिला एकेरी गटात 54 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

पुरुष गटात संदीप दिवे, योगेश परदेशी, आर. एम. शंकरा व प्रशांत मोरे या आजी व माजी विश्वविजेत्यांशिवाय श्रीलंकेचे शाहिद हिल्मी, अनास अहमद, मालदीवजचे इस्माईल अझमीन, इब्राहिम हुजान अली तसेच महिला गटात अमेरिकेत झालेल्या विश्व कप स्पर्धेत तिसरी आलेली अमेरिकेची प्रीती जखोटिया, श्रीलंकेची जोसेफ रोशिता, तशमीला कविंदी, मालदीवजची ऐशाथ फैनाझ, फातमाथ रयाना स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

पुरुष गटात आसामच्या मुजिबूर रहमान, जुगल किशोर दत्ता, तामीळनाडूच्या आर. आरोक्यराज, मगेश देवराज महाराष्ट्रातील महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर, अभिजित त्रिपनकर, राजेश गोहिल, दिलेश खेडेकर, जितेंद्र काळे, हिदायत अन्सारी, अनिल मुंढे, योगेश धोंगडे, प्रकाश गायकवाड, पंकज पवार, राहुल सोलंकी, नरसिंगराव सकारी, सागर वाघमारे, संजय मांडे, रहिम खान, विकास धारिया तर महिला गटात देबजानी तामुली, काजल कुमारी, नीलम घोडके, आकांक्षा कदम, अंबिका हरिथ, संगीता चांदोरकर आणि ऐशा साजिद खान या अव्वल खेळाडूंव्यतिरिक्त मालदीवज, श्रीलंका, अमेरिकेतील इतर खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

पुरुष गटातील पहिल्या 32 व महिला गटातील पहिल्या 16 खेळाडूंना मिळून एकंदर 10 लाखांची बक्षिसे जाहिर करण्यात आली आहेत. प्रथम फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱया खेळाडूंना रोख बक्षीस देण्यात येईल. पुरुष एकेरी विजेत्याला 1 लाख 50 हजार, उपविजेत्याला 1 लाख व तिसऱया क्रमांकाच्या खेळाडूला 75 हजार व चषक तर महिला विजेतीला 1 लाख, उपविजेतीला 50 हजार व तिसऱया क्रमांकाच्या खेळाडूला 30 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहेत.

पुरुष एकेरी ः 1) झैद अहमद फारुकी (महाराष्ट्र ), 2) प्रशांत मोरे (महाराष्ट्र ), 3) योगेश धोंगडे (महाराष्ट्र ), 4) महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ), 5) महम्मद वाजिद अन्सारी
( महाराष्ट्र ), 6) अभिषेक चव्हाण ( महाराष्ट्र ), 7) सागर वाघमारे ( महाराष्ट्र ), 8) संदीप दिवे ( महाराष्ट्र )
महिला एकेरी ः 1) प्रीती जखोटिया ( अमेरिका ), 2) जोसेफ रोशिता ( श्रीलंका ), 3) ऐशाथ फैनाझ ( मालदीवज), 4) नीलम घोडके ( महाराष्ट्र ), 5) काजल कुमारी ( महाराष्ट्र),
6 ) हिरुषी मलशानी ( श्रीलंका ), 7) फातमाथ रयाना (मालदीवज), 8) आकांक्षा कदम ( महाराष्ट्र )