महाविकास आघाडीचे बहुमताचे सरकार येईल – नाना पटोले

महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज असून 288 जागांवर लढणार आहे, आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद नसून महाराष्ट्राला वाचवणे हे आघाडीचे लक्ष्य आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना राज्यात कुठलेही स्थान मिळता कामा नये याची खबरदारी घेऊ. महाराष्ट्रात मोदी-शाह यांचा विचार कदापी रुजू देणार नाही., असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  म्हणाले.