Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात एकूण 62 टक्के मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद

फोटो - चंद्रकांत पालकर
  •  महाराष्ट्रात एकूण 62 टक्के मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद

राज्यभरातील 288 मतदार केंद्रात मतदान पार पडले, अनेक ठिकाणी मतदानाला लागले गालबोट

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

– नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजता 53.78 तर, विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 55.88 टक्के मतदान

– राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 मतदान

– महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेर्यंत 45.53 टक्के मतदान

– ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.51 टक्के मतदान झाले आहे. ओवळा- माजिवडा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 26.71 टक्के मतदान झाले आहे. कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.21 टक्के मतदान झाले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 27.39 टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्रात संथगतीने मतदान, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान; राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –

अहमदनगर – ३२.९० टक्के,
अकोला – २९.८७ टक्के,
अमरावती – ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड – ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे – ३४.०५ टक्के,
गडचिरोली- ५०.८९ टक्के,
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली – ३५.९७ टक्के,
जळगाव – २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर – ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर – ३१.६५ टक्के,
नांदेड – २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक – ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर – ३३.४० टक्के,
परभणी-३३.१२ टक्के,
पुणे – २९.०३ टक्के,
रायगड – ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
सोलापूर – २९.४४,
ठाणे – २८.३५ टक्के,
वर्धा – ३४.५५ टक्के,
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ – ३४.१० टक्के मतदान झाले आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्याला कडक सॅल्युट! तान्हुल्याला कडेवर घेत खाकीतील ‘आई’ बजावतेय इलेक्शन ड्यूटी


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सहकुटुंब केले मतदान

माहीम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार महेश सावंत यांनी सहकुटुंब मतदान केलं

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

कमळाचा टी-शर्ट घालून आल्याने भाजपच्या महिला कार्यकर्तीला मतदान केंद्रावरून हाकलले (फोटो – चंद्रकांत पालकर)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वांद्रे पूर्व मतदारसंघात सहकुटुंब मतदान

महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान, गडचिरोलीत सर्वाधिक 30 टक्के मतदान

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 11 वाजता 12.59 टक्के तर, विधानसभा मतदारसंघात 13.67 टक्के मतदान

लातूर जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.91 टक्के मतदान

श्रीगोंदा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 4.53 टक्के मतदान

पालघरमधील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी… पालघर मतदारसंघ 5.94 टक्के, बोईसर मतदारसंघ 6.97 टक्के, डहाणू मतदारसंघ 8.5 टक्के, विक्रमगड मतदारसंघ 6.4 टक्के मतदान

रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.55 टक्के मतदान

महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान, मुंबई शहरात 6.25, तर मुंबई उपनगरात 7.88 टक्के मतदान

राधाकृष्ण विखे-पाटलाच्या कॉलेजमध्ये बाहेरून शिकायला आलेल्या मुलांचे मतदान? काँग्रेस उमेदवाराने विचारला जाब

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर मतदान करा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आवाहन


अकोल्यात EVM मध्ये बिघाड, थोड्या वेळेसाठी मतदान प्रक्रिया थांबवली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी बजावला मतदानाचा हक्क


अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र बंद पडले आहे. बी.आर. हायस्कूलमधील बूथ क्रमांक १०६ मध्ये हे EVM बंद पडले आहे. तास दीड तास झाले तरी हे मशीन बंद असल्याने अनेक मतदार आल्या पावली परत गेले आहेत. तांत्रिक कारणामुळे हे मशीन बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क

मुंबईकरांनी मतदानासाठी दाखवला उत्साह

कर्जत जामखेडमध्ये काही पोलिंग बुथवर EVM मशीनवर रोहित पवारांच्या विरोधक आणि डमी उमेदवाराच्या नावापुढे एक काळा डाग असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. याबाबत रोहित पवारांनी याबाबत बुथ प्रमुखाकडे तक्रार केली आहे.


पनवेल विधानसभेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांनी बजावला मतदानाचा हक्क


महाविकास आघाडीचे बेलापूरचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला

 

 

बारामतीमधून १०० टक्के जिंकणार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास

अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

 

राज्यात 288 मतदारसंघासाठी मतदान सुरू, सकाळी 7 वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदारांची रांग