
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विविध पदांसाठी आज झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत जय कवळी व आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलने यश मिळवले आहे. अध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 29 जागा या पॅनेलने जिंकल्या आहेत. अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी रणजीत सावरकर यांचा पराभव केला.
अध्यक्षांसह 16 उपाध्यक्ष, महासचिव, 8 विभागीय सचिव, खजिनदार, कार्यकारी सचिव, व्यवस्थापकीय सदस्य असे एपूण 29 पदाधिकारी निवडले गेले. खजिनदारपदी अॅड. मनोज पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली. विभागीय सचिवांच्या 8 जागांपैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यात नाशिकचे मयूर बोरसे, कोल्हापूरचे मंगेश कराळे, लातूरचे अॅड संपत साळुंखे, छत्रपती संभाजीनगरचे अरुण भोसले, पुण्याचे विजयपुमार यादव आणि अमरावतीचे विजय गोटे यांचा समावेश आहे.




























































