
खत विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधित विव्रेत्यांचे परवाने 15 दिवसांऐवजी सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. नांदेड जिह्यातील नायगाव येथील 7 रासायनिक खत विक्री केंद्रांची तपासणी केली. तपासणीत चार विक्रेत्यांनी जास्त दराने खत विक्री केल्याचे, तर तीन विक्रेत्यांनी साठा असूनही खत उपलब्ध करून दिले नसल्याचे आढळले. या प्रकरणी विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. राजेश पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

























































