Maharashtra Budget 2026 – शंभुराजेंचे नाव घेता मग स्मारकासाठी निधी देताना हात का आखडता? – कैलास पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, मग वडू तुळापूरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी देताना सरकारचा हात का आखडतो, असा खडा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत केला.

महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता, पण आज परिस्थिती काय आहे? स्मारक दोन टप्प्यांत होणार होते. पहिला टप्पा 282 कोटींचा तर दुसरा टप्पा 250 कोटींचा होता. स्मारकासाठी 23-24 मध्ये 30 कोटी, 24-25 मध्ये 46 कोटी निधी दिला गेला. 25-26 मध्ये 75 कोटींची तरतूद होती. चालू अर्थसंकल्पात 26-27 मध्ये 75 कोटींपेक्षा जास्त तरतूद व्हायला होती, परंतु ती कमी होऊन 50 कोटीच केली गेली, असे कैलास पाटील म्हणाले.

दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर तो 250 कोटींचा आहे, त्यालाही शिखर समितीने मान्यता दिलेली नाही याकडे लक्ष वेधतानाच, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रखडलेय तसे संभाजी महाराजांचे रखडू नये हीच अपेक्षा आहे, असे कैलास पाटील यांनी सांगितले.