
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल ठरला आहे. यंदा गणेशोत्सव संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता. महाराष्ट्राचा हा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. विविध निकषांवर मूल्यांकन करत महाराष्ट्राला पहिला क्रमांक जाहीर करण्यात आला असून, केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली. जम्मू-कश्मीरच्या चित्ररथाने दुसरा तर केरळच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर, श्रीपाद भोंगाडे यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला होता. चित्ररथावर महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सजावट करण्यात आली होती. अष्टविनायकाच्या प्रतिकृती, ढोलताशे आणि गणपतीची मूर्ती अशी चित्ररथावर सजावट करण्यात आली होती. यंदाच्या प्रजासत्ताक परेडमध्ये देशभरातून एकूण 30 चित्ररथांचा सहभाग घेतला होता.



























































