
मुंबई महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधीच्या, पात्र फेरीवाल्यांच्या निवडणुकीत मुंबई शहरातील फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱया महाराष्ट्र हॉकर्स युनियनने भरघोस यश संपादन केले. घाटकोपर एन विभागातून सुशीला लोखंडे आणि राजेश खरात यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर मुंबई अपेक्समधून मच्छिंद्र तुळे यांनी विजय मिळवला.
फेरीवाला बांधवांसाठी शरद इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्षांपासून ही संघटना कार्यरत आहे. महाराष्ट्र हॉकर्स युनियनचे अध्यक्ष अॅड. प्रद्युम्न वाघमारे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बी.जी.गायकवाड, दिलीप चिकणे, प्रकाश कांबळे, काशीनाथ आमकर, लता कांबळे, सुनीता शिंदे आदी उपस्थित होते.

























































