आरे स्टॉल हटवण्याविरुद्ध आवाज, दूध वितरक सेनेच्या वार्षिक सभेत विविध समस्यांवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र दूध वितरक सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिवसेना भवन दादर येथे झाली. आरे स्टॉल धारकांनी विविध विषयाबाबत आपले मत यावेळी व्यक्त केले. आरे दूध व दुग्धजन्य पदार्थ आरे स्टॉलवर उपलब्ध नसल्यामुळे आरे स्टॉलचे अस्तित्व धोक्यात आले आहे, पालिकेद्वारे आरे स्टॉलला नोटीस देऊन आरे स्टॉल हटवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

शिवसेना नेते, खासदार तसेच महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार ही सभा झाली. सभेचे अध्यक्षपद राम कदम यांनी भूषवले तर सूत्रसंचालन आदिनाथ हिरवे यांनी केले इतिवृत्त वाचन, सरचिटणीस सतीश सावंत यांनी तर आर्थिक कार्य अहवाल कोषाध्यक्ष विलास भुजबळ यांनी मांडला. आभार प्रदर्शन अमित भुवड यांनी केले. आरे स्टॉलच्या भुईभाड्यावरील अधिभार रद्द करण्याची मागणीही या सभेतून करण्यात आली.