भाजपचा हिंदुत्ववाद फसवा, त्यांच्या ‘सत्ता जिहादा’विरोधात आम्ही उभे ठाकलोय; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मंगळवारी सद्भावना दिवस संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा खोटेपणा उघड करत त्यांच्यावर प्रहार केले. भाजपचे हिंदुत्व फसवे असून ते सत्तेसाठी भ्रष्टाचाऱ्यांनाही सोबत घेत आहेत. त्यांचा सत्ताजिहार आहे. त्याविरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही ते म्हणाले. आम्ही पुर्वी काँग्रेसच्या विरोधात होतो. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसविरोधी भाषणे ऐकत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे या कार्यक्रमात काय बोलायचे, हा प्रश्नच होता. मात्र, जे पटत नव्हते, त्याविरोधात कालही बोलत होतो, आताही बोलतोय आणि उद्याही बोलणार, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

या कार्यक्रमात आपण काँग्रेस पक्षाचे बॅनर आणि नाव असलेला पट्टा गळ्यात लावला होता. आता उद्या त्याच्या बातम्या करतील. त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे आपल्या गोष्टी ते मोठ्या करून मांडतात. ते राजकीय सूडबुद्धीने वागत आहेत. आमच्या विरोधात सूडभावना कधीही नव्हती. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून आपण करतो. आता राजकारणात एका बाजूला सद्भावना आहे, तर दुसरीकडे सूडभावना आहे. आम्ही नेहमी सद्भावनेसोबत होतो आणि राहणार. आम्ही विरोध केला, शरद पवार आणि बाळासाहेब यांचे घनिष्ठ नाते होते, विरोधही होता. त्याचे नाते तेच सांगू शकतील, असे ते नात्याचे बंध होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपेक्षा जास्त काळ सत्तेत होते. आम्ही कडाडून विरोध करत होतो. मात्र, त्यात सूडभावना कधीही नव्हती. काँग्रेस आमच्याशी कधीही सूडभावनेने वागली नाही आणि आम्ही सूडभावना ठेवली नाही. यालाच राज्यकर्ते म्हणतात. यावेळी त्यांनी 1995 मधील एक आठवणही सांगितली. त्यावेळी शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी बाळासाहेब मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले होते, तुम्ही राज्यकर्ते आहात. आपल्याविरोधात काँग्रेस आंदोलन करेल, रस्त्यावर उतरेल, मात्र, त्यांच्यावर लाठी चालवायची नाही, असे बाळासाहेबांनी दोघांनाही सांगितले होते. ते काँग्रेसचे असले तरी ते आपल्या महाराष्ट्रातील आहेत. आता हा मणुसकीचा भाव दिसत नाही, ही भावना कमी होत आहे, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनाप्रमुखांनी राजीव गांधी यांच्यावरही सडेतोड टीका केली. पण त्याकाळात शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कम ट्रक्सवाले आले नव्हते. अनेकदा माणसे सजमण्यासाठी वेळ जावा लागतो, राजीव गांधी कसे होते, ते समजण्यास काही वेळ लागला. तसेच आताची लोकं कशी आहेत, ते कळायलाही वेळ लागला. पण माणसे समजल्यानंतर आपण सुधारायला हवे. आमचा गैरवापर करत ते दिल्लीत गेले आणि आता आम्हालाच लाथा घालत आहेत. तर राजीव गांधी यांनी कधीही सूडभावना ठेवली नव्हती. तोच हा फरक आहे. शिवसेनेमुळे ते सत्तेत आले, मित्र म्हणून तुम्हाला संकटकाळात साथ दिली. तेच आपल्याला संपवायला निघाले आहेत, ते आपले मित्र कसे असू शकतात, असा सवालही त्यांनी केला.

राजीव गांधी सभ्य, सुसंस्कृत व्यक्तीमत्व होते. त्यांनी कोणत्याही राज्याची ओळख पुसली नाही. त्यांनी अनेक लसीकरण मोहीम राबवली. मात्र, कोणत्याही लसीवर त्यांचा फोटो नाही. आता मणीपूर जळतेय, जळू द्या, सत्ताधाऱ्यांना काहीही फरक पडत नाही. त्याकाळी राजीव गांधी यांनी ईशान्येकडील राज्यांशी शांतता करार केला होता. राजीव गांधीबाबत अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, आज आपण राजीव गांधी यांच्यामुळे जिंवत आहोत. त्यांना उपचारासाठी राजीव गांधी यांनी परदेशात पाठवत मदतही केली होती. त्यांनी घेषणा न देता 400 पार गेले होते. जनतेने सत्ता दिल्यानंतरही त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. लोकशाही जपत अधिकार विभागले होते. सत्ता असतानाही त्यांच्याकडे मीपण नव्हता. हीच त्यांची ओळख होती, असेही ते म्हणाले.

बदलापूरमधील घटना संतपाजनक आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि पश्चिम बंगालमधील घटनेचे राजकारण करायचे, असे त्यांचे सुरू आहे. अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. अशी प्रकरणे फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे. त्यात वेळ जातो आणि असे गुन्हे वाढतात. एकेकाळी संघमुक्त भारत म्हणणारे नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू हिंदुत्त्ववादी आहेत का, भाजपचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. भाजपचा सत्ता जिहाद आहे, त्याविरोधात आपण उभे ठाकलो आहोत, असा निर्धारही त्यांनी केला. आपण हिंदुत्व सोडले नाही आणि सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता लोकसभेत आपण करून दाखवले आहे. आता विधानसभेत त्यांचा सुपडा साफ करायचा आहे. आपले देशाचे आणि राज्याचे संस्कार जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आपण व्रजमूठ उगारून आपण एकत्र आले पाहिजे. देशावर आलेले हे संकट आपण संपवून टाकू, हीच राजीव गांधी यांना खरी श्रद्धाजंली ठरेल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.