महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाची 2025 ते 2027 या दोन वर्षांसाठीची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आहे. संघाच्या राज्य अध्यक्षपदी नितीन देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी विनोद परमार, प्रमोद मोरे, संदीप तारगे, उमाकांत मुळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी अविनाश भुजबळराव, सागर घाडगे यांची तर महासचिवपदी सुदर्शन शिंदे यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. विविध शासकीय कार्यालये, रुग्णालय, शासकीय महामंडळे, शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, पदाधिकारी, सदस्य बहुतांश अधिकारी पदावर पदोन्नती झाल्यामुळे महासंघाच्या नावात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी यापुढे महासंघाचे नाव ‘महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी महासंघ’ म्हणून करण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.