
महिला सुरक्षेबाबत निष्काळजी महायुती सरकारचा विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तीव्र निषेध नोंदवला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेधाचे फलक झळकावले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
‘महिला सुरक्षेचं नुसतंच गाजर…सरकारला फुटत नाही पाझर’ अशा घोषणांनी या वेळी विधान भवनाचा परिसर दुमदुमला. ‘बेटी बचाव जुमला है…ये मंत्री दरिंदा है’ अशा घोषणा देत मंत्री जयकुमार गोरे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा महायुतीने केली होती, पण सरकार आल्यावर मात्र लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे. 2100 रुपये कधी देणार ही भूमिका सरकार स्पष्ट करत नसल्याचा आरोप या वेळी विरोधकांनी केला.