
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदा मशाल पेटणार आहे. प्रभाग क्र.१० मधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगांवकर यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. दोन्ही उमेदवारांना नागरिकांकडून पाठिंबा मिळत आहे.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रभाग क्र.१० मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख राजाराम रहाटे निवडणूक लढवत आहेत. तीस वर्ष ते शिवसेनेत सक्रिय आहेत. विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्या सोबत श्वेता कोरगांवकर निवडणूक लढवत आहेत. त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे. सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून त्यांना नागरिकांकडून पाठिंबा मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांनीही या प्रभागात जोरदार प्रचार केला आहे. याप्रचारात उपशहरप्रमुख नितीन तळेकर,उपविभागप्रमुख प्रशांत बंदरकर,योगेश कोरगांवकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.




























































