सुप्रीम कोर्ट परिसरात रील काढण्यास बंदी

सर्वोच्च न्यायालयातील मुख्य कॅम्पसला उच्च सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता या परिसरात इन्स्टा रील आणि व्हिडीओग्राफी काढण्यास बंदी घातली आहे. यासंबंधीचे परिपत्रक सुप्रीम कोर्टाने माध्यमांसाठी जारी केले आहे. मुलाखती आणि लाईव्ह प्रक्षेपण फक्त कमी सुरक्षा असलेल्या लॉन परिसरातच करता येईल. जर माध्यम कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले तर  एका महिन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.