
ग्रीन सान्वी नावाचे एक मोठे एलपीजी टँकर 46,655 मेट्रिक टन गॅस घेऊन सोमवारी मुंबईत येत आहे. या जहाजाने स्ट्रेट ऑफ होर्मुज पार केले आहे. याआधी जग वसंत आणि पाइन गॅससारखी सहा जहाजे हिंदुस्थानात दाखल झाली आहेत. ग्रीन आशा आणि गज विक्रमसारख्या अन्य जहाजांनासुद्धा सुरक्षित मार्ग मिळण्याची अपेक्षा आहे. या जहाजांना टप्प्याटप्याने सुरक्षित बाहेर काढले जाईल. अजूनही 17 हिंदुस्थानी जहाजे समुद्रात अडकलेली आहेत.






























































