xAI मध्ये मोठी उलथापालथ; एलॉन मस्क कंपनी पुन्हा नव्याने उभी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलाॅन मस्क यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी xAI मध्ये मोठ्या प्रमाणावर नेतृत्व बदल आणि राजीनाम्यांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी कंपनी मुळापासून पुन्हा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत xAI मधील अनेक सहसंस्थापक आणि वरिष्ठ संशोधकांनी कंपनी सोडली. टोबे पोहलेन, जिमी बा, टोनी वु, ग्रेग यांग यांसारखे संशोधक कंपनीतून बाहेर पडले होते. त्यामुळेच आता पूर्वीपैकी सुमारे 11-12 सहसंस्थापकांपैकी फक्त दोनच सदस्य उरले आहेत असे अहवालांतर्गत समजते.

मस्क यांनी स्वतः मान्य केले की xAI ची सुरुवातीची रचना योग्य नव्हती. त्यामुळे कंपनीची पूर्ण पुनर्रचना केली जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, xAI पहिल्यांदा योग्य प्रकारे बांधली गेली नव्हती, त्यामुळे ती आता पुन्हा उभारली जात आहे.” मस्क यांनी पूर्वी नोकरीसाठी नाकारलेल्या काही प्रतिभावान उमेदवारांची पुन्हा भरती करण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे.

xAI ही कंपनी Grok नावाच्या AI चॅटबॉटसाठी ओळखली जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर उपलब्ध आहे. नेतृत्वातील बदलांमुळे Grok आणि इतर AI प्रकल्पांवरही परिणाम झाला असल्याचे अहवाल सांगतात. अहवालानुसार, xAI मधील कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी मस्क यांनी स्पेसएक्स आणि टेस्ला येथील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. या प्रक्रियेनंतर काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आणि काहींनी स्वेच्छेने कंपनी सोडली. xAI ची स्थापना 2023 मध्ये झाली होती आणि ती OpenAI आणि अॅंथ्रोपिक सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु नेतृत्व बदल आणि अंतर्गत तणावामुळे कंपनीसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.