जगातील 29 पैकी 23 देशांना भविष्याची चिंता, ग्लोबल रिसर्च फर्म इप्सोसच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील अनेक देश सध्या चिंताग्रस्त आहे. जगात अर्थव्यवस्थांसाठी आव्हाने वाढल्याने अनेक देश भविष्याबद्दल चिंताग्रस्त असून या देशांत निराशा झपाट्याने वाढत असल्याची माहिती ग्लोबल रिसर्च फर्म इप्सोसने मार्च 2026 मध्ये केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालाचे शीर्षक ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ असे आहे.

या अहवालात एकूण 29 देशांमध्ये सर्वेक्षण केले असून यातील 23 देश हे भविष्याची चिंता करत असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणामध्ये नागरिकांची प्रमुख राष्ट्रीय मुद्दय़ांवरील मतेदेखील समाविष्ट करण्यात आली आहेत, जे त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. सर्वेक्षणामध्ये अनेक लोकांनी मान्य केले आहे की तेल आणि वायू पुरवठय़ावरील वाढता दबाव भविष्यात एक आव्हान बनू शकतो. जागतिक चिंतांमध्ये गुन्हेगारी, हिंसा, बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि सामाजिक असमानता, आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार प्रमुख आहेत. हिंदुस्थानातही महागाई, बेरोजगारी, शिक्षण, गुन्हेगारी आणि हिंसा याव्यतिरिक्त आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार या मोठय़ा चिंता आहेत. गेल्या काही वर्षांत या तणावांनी आणि संघर्षांनी जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे, असे इप्सोस इंडियाचे सीईओ सुरेश रामलिंगम यांनी म्हटले आहे.