
मलेशियातील एका 33 वर्षीय व्यक्तीच्या तोंडात तब्बल 42 दात आहेत. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. प्रताब मुनियंडी असे त्याचे नाव आहे. या अनोख्या दातांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सर्वसाधारणपणे माणसाला 32 दात असतात, पण या विक्रमवीर व्यक्तीकडे 42 दात आहेत. आणि आश्चर्य म्हणजे, त्याला आणखी 3 नवे दात येत आहेत. 2023 मध्ये प्रताब दंतवैद्यांकडे तपासणीसाठी गेला. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या विविध चाचण्यांमध्ये जास्त दात असल्याचे दिसून आले. या अतिरिक्त दातांमुळे त्याला अद्याप कोणताही त्रास झालेला नाही, पण जास्त दात असल्यामुळे त्याला जास्त काळजी घ्यावी लागते.



























































