ममता बॅनर्जी यांची पक्षाच्या खासदारांसोबत बैठक; तृणमूलची पुढची रणनीती ठरली

पश्चिम बंदालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. तसेच निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची रणनीती ठरवण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना महत्त्वाची जबाबदारी दिली असून त्यांची लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. आता अभिषेक बॅनर्जी हे ज्येष्ठ खासदार सुदीप बॅनर्जी यांची जागा घेतील, ज्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असं सांगण्यात येत आहे.

ते लोकसभेत पक्षाचे नेतृत्व बळकट करतील आणि इंडिया आघाडीत त्यांच्या पक्षासाठी समन्वयाचे काम करतील. ममता बॅनर्जी यांनी खासदारांसोबतच्या 12 मिनिटांच्या बैठकीत ही घोषणा केली आणि पक्षची पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. दिल्लीत बंगाल आणि त्याच्या सत्ताधारी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे अशा काळात परिपक्व नेत्याची गरज आहे जो सुसंगत असेल आणि पक्षाची दिशा ठरवू शकेल. त्यामुळे अभिषेक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंगाल आणि राज्यातील लोकांशी संबंधित मुद्द्यांवर विशेष लक्ष देऊन अभिषेक राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे.

ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांनात्यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जाते. आता त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी कल्याण बंदोपाध्याय यांच्या भूमिकेवर टीका केली. तेव्हा या ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे अखेर सुदीप बॅनर्जी यांना लोकसभा पदावरून काढून टाकण्याची घोषणा पक्षाने केली.

कल्याण बॅनर्जी यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, खासदारांमधील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप त्यांच्यावर होणे अयोग्य आहे. मी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिला आहे कारण ‘दीदी’ यांनी व्हर्च्युअल बैठकीत म्हटले होते की पक्षाच्या खासदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे दोष माझ्यावर आहे. त्यामुळेच मी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. ज्यांना ममता बॅनर्जींनी खासदार बनवले ते लोकसभेतही येत नाहीत. दक्षिण कोलकाता, बराकपूर, बांकुरा, उत्तर कोलकाता… संसदेत फारसे कोणी उपस्थित राहत नाही. मी काय करू शकतो? माझी चूक काय? प्रत्येक गोष्टीसाठी मला दोष दिला जात आहे,” असे ते म्हणाले.